काटी:-धाराशिव जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या तामलवाडी प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश गायकवाड तर उपाध्यक्षपदी साधू शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. प्रिंट मीडिया संघटनेचे सल्लागार अविनाश गायकवाड व संतोष मगर यांनी संघटनेची बांधणी करून संघाच्या सदस्यांना कर्तव्य, जबाबदारी, संघटनात्मक तत्वे याविषयी मार्गदर्शन करुन निवड प्रक्रिया जाहीर केली.
यामध्ये संघटनेच्या सचिवपदी उमाजी गायकवाड तर कार्याध्यक्षपदी दादासाहेब काडगावकर यांची निवड करण्यात आली. तर संघटनेच्या सदस्यपदी अभिमान हंगरकर, यशवंत कुलकर्णी, प्रभाकर जाधव, सखा माळी, बालाजी राऊत, शहाजी पाटील, साधू यांची निवड करण्यात आली.
0 Comments