Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांच्या हिंदू बहुजन सन्मान संवाद यात्रेचे काटीमध्ये जंगी स्वागत

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 7 रोजी सकाळी 11:30 वाजता संत सावता क्रांती परिषदेच्या माध्यमातून भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बहुजन सन्मान संवाद यात्रेचे काटीमध्ये ओबीसी  बांधवांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

प्रारंभी येथील महात्मा फुले नवरात्र उत्सवातील देवीच्या मूर्तीची आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्यासह ओबीसी  बांधवांनी आ.टिळेकर यांचे शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.

माळी समाजाचे नेते योगेश टिळेकर यांनी ओबीसी  बांधवांशी संवाद  साधताना भाजपने विधान परिषदेवर संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत व महात्मा  फुले नवरात्र उत्सवातील देवीचा आशीर्वाद घेत म्हणाले की,भाजपाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, याबद्दल मी कृतज्ञ असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याच हिंदवी स्वराज्यामुळे हिंदू समाजात सुरक्षिततेची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.छत्रपतींनी स्थापलेले तेच हिंदवी स्वराज्य आज जागतिक पटलावर भारताची प्रतिमा उंचावत आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वत:चे राज्य. हिंदवी स्वराज्यामुळे देशात जाती-धर्माचा विचार न करता मानवी समाज अन्याय, अत्याचाराविरुद्ध एकवटला. हिंदवी स्वराज्य हे खर्‍या अर्थाने जनतेने निर्माण केलेले अर्थात रयतेचे राज्य होते. त्याच प्रमाणे भारतीय जनता पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष असून बहुजनांनी भारतीय  जनता  पक्षासोबत राहण्याचे व येत्या विधानसभेसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच काटी गावासाठी स्वतः च्या आमदार फंडातून 20 लाख निधी देण्याची घोषणा केली.


जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शुभांगी ढगे यांचा सत्कार
या कार्यक्रमात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते काटी येथील द्राक्ष बागायतदार शुभांगी नाबाजी ढगे यांना राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी सरपंच आदेश कोळी,शरद पेठकर, मारुती रोकडे,बाळासाहेब वाडकर,महेश गोरे राहुल गोरे, लक्ष्मण माळी,विष्णू माळी, माजी सरपंच शामराव आगलावे, रामेश्वर लाडुळकर,अनिल गुंड,रामहरी थोरबोले, बाळासाहेब भाले,नाबाजी ढगे, भैरी काळे,तानाजी हजारे, दादा  चवळे, सचिन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments