काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील माळी बंधूंच्या माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने गणेशोत्सव,दसरा ते दिवाळी या दरम्यान माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्समधून दहा हजारांहून जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी
आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ धमाका ऑफरच्या माध्यमातून विविध आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली होती.
प्रारंभी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या हस्ते येथील ग्रामदैवत कंचेश्वर प्रतिमेचे पूजन करुन या भव्य लकी ड्रॉ ऑफरची सुरुवात करण्यात आली.
या लकी ड्रॉ सोडतीत प्रथम क्रमाकांच्या मोटार सायकल बक्षिसाच्या मानकरी ठरल्या टेलर नगरच्या महिला जहीरा शेख तर द्वितीय क्रमांकांचे वाशिंग मशिनचे बक्षिस गंधोरा येथील गजेंद्र कोनाळे यांना मिळाले तर उर्वरित बक्षिसांमध्ये तृतीय क्रमांक एलईडी टी.व्ही.सुवर्णा देडे खडकी, चतुर्थ क्रमांक कुलर अश्विनी क्षिरसागर इटकळ तर पाच ते विसाव्या क्रमांकाच्या बक्षिसांमध्ये काडगाव , खडकी, मंगरुळ, अरळी, इटकळ आदी गावांतील पैठणीचे मानकरी ठरले.
मंगरुळ येथील माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर बुधवार दि.25 रोजी माळी बंधूंच्या कन्या राजनंदिनी, राजवीर, राजदीप आणि उपस्थित ग्राहकांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. या सोडततील प्रत्येक विजेत्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
साेडत कार्यक्रमाप्रसंगी माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा पोलीस पाटील लक्ष्मण माळी, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, पत्रकार दिनेश सलगरे, चॉंदसाहेब शेख, राम माळी, सचिन माळी, नितीन माळी यांच्यासह परिसरातील ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments