Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरच्या सॉफ्ट टेनिस खेळाडूंची चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण पदकांसह चार पदकांची कमाई

तुळजापूर/प्रतिनिधी 
 राष्ट्रीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेत तुळजापूर च्या खेळाडूंची चमकदार कामगीरी करत दोन सुवर्ण सह ०४ पदके पटकावली. या स्पर्धेत प्रियंका हंगरगेकर ने एकेरी मध्ये सुवर्ण पदक पटकावत अजिंक्य पद पटकावले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तब्बल ११ पदके पटकावली आहेत.  
    
देवास - मध्यप्रदेश येथे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघाने चमकदार कामगीरी केली आहे. 
   
या स्पर्धेत प्रियंका हंगरगेकर नु १७ वर्षे वयोगटात एकेरी सह सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच समर्थ शिंदे ने १४ वर्षे वयोगटात सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. याशिवाय यश हुंडेकरी ने १९ वर्षे वयोगटात सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक संजय नागरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 
   
यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सचिव रवींद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव सीराज शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments