Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रुग्णाच्या पोटात सव्वा चार किलोची गाठ; तुळजापूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी

तुळजापूर/उमाजी गायकवाड
 पोटातील 30 सेंटीमीटर  चार किलो 250 ग्रॅम वजनाच्या गाठीमुळे प्रकृतीच्या विविध तक्रारींचा सामना करणाऱ्या रग्णाला जीवदान देण्यात तुळजापूर शहरातील तुळजापूर मल्टीस्पेशालिटी मधील डॉक्टरांना तब्बल सव्वा चार किलो वजनाची गाठ काढण्यात यश आले आहे.

सदर पेशंट पोट दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता सर्व तपासण्या केल्यानंतर त्याच्या अंडाशयाच्या जवळ मोठी गाठ असल्याचे निदान झाले होते.त्या गाठीचा आकार साधारणपणे 30 सेंटीमीटर  25 सेंटीमीटर व वजन चार किलो 250 ग्रॅम होते. धाराशिव जिल्ह्यातील एवढी मोठी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडण्याची ही पहीलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

धाराशिव व सोलापूर येथील प्रसिद्ध  जनरल सर्जन व कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर बालाजी समुद्रे  यांनी यशस्वी रित्या सर्जरी केली.भुलतज्ज्ञ डॉ सचिन सुतार यांनी काम पहिले 

या शस्त्रक्रिया साठी सहाय्यक स्टाफ डॉ मोनल मगर,डॉ. आकाश भाकरे, डॉ. कृष्णा स्वामी ,डॉ. राजेश पाटील, श्री. रत्नदीप जाधव आदीसह तुळजापूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्टाफ यांच्या प्रयत्नातून ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

 तुळजापूर मध्ये प्रथमच एवढी मोठी गाठ असलेल्या पेशंटवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पेशंट तंदुरुस्त होऊन घरी आनंदाने परत गेला आहे.

Post a Comment

0 Comments