Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी पोलीस ठाण्याचे नूतन सपोनि गोकुळ ठाकूर यांचे सत्काराने स्वागत

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे नूतन सपोनि गोकुळ  ठाकूर यांचा पत्रकार  उमाजी गायकवाड, सोमनाथ पुजारी व राहुल जाधव यांच्या वतीने सोमवार  दि.17 रोजी सकाळी 10:30 वाजता आई तुळजाभवानीची कवड्याची  माळ, पुष्पगुच्छ व शामची आई पुस्तक देऊन सत्काराने स्वागत करण्यात आले.

यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ  ठाकूर यांनी पोलिस तामलवाडी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात  आल्या.

यावेळी सपोनि  गोकुळ ठाकूर, पत्रकार उमाजी गायकवाड, सोमनाथ पुजारी,राहुल जाधव, गोपीनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर, पोलीस  कर्मचारी माने आदीसह तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments