धाराशिव:- धाराशिव जिल्ह्यासह शहरातील व ग्रामीण भागासह सर्व तालुक्यातील मातंग समाजातील सर्व राजकीय पक्षाच्या तसेच सामाजिक संघटनांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बुधवार. दि. 19 मार्च रोजी दुपारी 1 वाजता धाराशिव येथील शासकीय विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण लवकरात लवकर होऊन मातंग समाजाला सामाजिक न्याय मिळावा, यासाठी 20 मे 2025 रोजी मुंबईमधील आझाद मैदानावर मातंग समाजाचे भव्य आंदोलन करण्याविषयी महत्र्चात्वाची चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीत आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती,उपसभापती, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संघटना प्रमुख, नेते, पदाधिककारी व कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व समाजबांधवांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments