काटी/उमाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा धाराशिव यांच्यावतीने तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्णजी तांबारे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा संघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनकजी घोष,जि.प.चे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी या उद्देशाने "गुढी पाडवा पट वाढवा" हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत मंगळवार दि. दि.18 रोजी अंगणवाडी शाळेतील बालकांचे पुष्पवृष्टी करत,चॉकलेट,पुष्पगुच्छ देऊन ढोलताशांच्या गजरात,टाळ्यांच्या निनादात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभानंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रवेश दिंडी काढण्यात आली.या दिंडीचे ग्रामस्थ,पालकांनी स्वागत केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकूंद शेटे,सहशिक्षक मोहन पौळ, श्रीमती विद्या भोसले श्रीमती पार्वती मुकरे,महादेव गायकवाड,रोहन गोंगाणे,कबिर सलगर, अंगणवाडी ताई श्रीमती केशर मुळे, श्रीमती सुलोचना गाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मुकूंद शेटे यांनी मानले.
0 Comments