Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथे सकल मराठा समाज मोफत वधूवर पालक मेळावा घेण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन


धाराशिव/प्रा.अभिमान हंगरगेकर 
धाराशिव येथील साईराम नगर येथे सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांच्या निवासस्थानी रविवार दि. 9 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता  सकल मराठा समाजाच्या वतीने मोफत वधुवर पालक मेळावा घेण्या संदर्भात आढावा बैठकीचे
आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत आज मराठा समाजातील युवकांच्या विवाहासंबंधी येत असलेल्या अडचणी संबंधी विविध समाज बांधव आपले विचार मांडणार आहेत.तसेच शेतकरी पुत्रांच्या विवाहाची समस्या आज गंभीर बनली आहे.या बैठकीत मराठा उपवर मुला मुलींच्या विवाह विषयक समस्यांची चर्चा होऊन वधूवर मेळावा घेण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यात मराठा मोफत वधूवर मेळावे घेतले जात आहेत.तसाच आपल्या जिल्ह्यातही सकल मराठा समाजाचा मोफत वधूवर पालक मेळावा आयोजित करण्यात यावा व मेळाव्याचे आयोजन आणि तारीख,वेळ ठरविण्यात येईल असा निर्णय घेण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त सकल मराठा समाजातील पालक, युवक,युवती,सक्रिय मराठा सेवक यानी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक प्रा.अभिमान हंगरगेकर,हनुमंत पवार,सतीश जाधव,अशोक चव्हाण,भारत हलकरे,रमेश काळे, चंद्रकांत शिंगटे, सुरेश गाढवे,रमेश साळुंके,रमेश सपाटे, नवनाथ काळे,तानाजी बिरंजे आदी सकल मराठा समाज बांधवांनी केले आहे. या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी केले आहे.

पत्रकार प्रा.अभिमान हंगरगेकर 
धाराशिव 

Post a Comment

0 Comments