तुळजापूर:- शहरातील पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमासह विशेष छावा चित्रपट शो चे आयोजन करण्यात आले आहे.
पूजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या सौभाग्यवती शुभांगी पुजारी यांच्या नेतृत्वात जागतिक महिला दिन विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शहरातील कर्तृत्ववान महिलांसह पुजारी नगर सोसायटी परिसरातील नौकरदार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमय जिवनपटावर निर्मिती झालेल्या शूरवीरगाथा छावा या चित्रपटाचा विशेष शोचे मोफत आयोजन रविवार 9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीनाथ लॉन्स नळदुर्ग रोड येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून छावा चित्रपट पहावा असे आवाहन शुभांगी पुजारी यांनी केले आहे.
0 Comments