Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारी नगर भागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध - रामचंद्र रोचकरी

तुळजापूर:- शहरातील वाढीव हद्दीतील पुजारी नगर  सोसायटी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून कायमस्वरूपी उपलब्ध असल्याचे मत रामचंद्र रोचकरी यांनी व्यक्त केले.

पुजारी नगर येथे रामचंद्र आणि निलेश रोचकरी बंधू यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रामचंद्र रोचकरी बोलत होते. पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, उपाध्यक्ष उमाजी गायकवाड आणि कार्याध्यक्ष श्रावण पवार यांच्या हस्ते रोचकरी बंधू यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मेजर हणमंत कदम, प्रभाकर टाकणे,तानाजी म्हेत्रे, प्रभाकर नलावडे, बापूसाहेब जगदे,नागनाथ पुजारी, सिद्धेश्वर इंगोले, वैभव ताटे, लिंबाजी पुजारी,प्रतीक कांबळे, मल्लेश विभुते,विशाल शिंदे, आदर्श कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments