Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

झरेगाव येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची अलोट गर्दी; विविध धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर पासून 18 किलोमीटर अंतरावरील बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील प्रसिद्ध श्री सदुरू दत्त मंदिरात "जय जय गुरुदेव दत्त" "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"च्या नामाचा जप करत गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी होती. दत्त भक्तांच्या उपस्थितीने येथील दत्त मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हावून गेला. येथील दत्त स्थानाची महती झरेगावसह बार्शी,तुळजापूर,वैराग,सोलापूर जिल्ह्यासह पंचक्रोशीत पसरली असल्याने येथील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दत्तभक्त येथील प्रत्येक कार्यक्रमात दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत. यंदा बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली होती.

बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत भक्तांना संबोधित करताना...

पहाटेपासूनच मंदिर परिसरात फुलांची व रांगोळीची सजावट करण्यात आली होती. तसेच मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे येथील वातावरण मोठे भक्तीमय झाले होते.

श्री गुरुवर्य काका महाराज, झरेगाव

श्री गुरुवर्य काका महाराज यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सकाळी पवित्र अभिषेक,दत्त नामजप,दुर्गाष्टक पठण यांसारख्या धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.दुपारनंतर विविध भजन,कीर्तन,प्रवचन,वाचन यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. परिसरात 'जय गुरुदेव दत्त', दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या
जयघोषांनी येथे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. गुरुपौर्णिमे दिवशी विविध भागांतून आलेल्या हजारो भक्तांनी दर्शन घेतले. महाराजांनी सर्व भाविकांना आशीर्वाद देत अध्यात्मिक मार्गदर्शन केले. सायंकाळी भव्य महाआरती झाली.या आरतीसाठी व दर्शनासाठी झरेगाव परिसरासह बार्शी तालुका व शेजारील जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.मंदिर परिसरात प्रसाद वाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी व पत्नी शुभांगी पुजारी यांनी सपत्नीक दत्त मंदिर व गुरुवर्य काका महाराज यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला....

शांतता व शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी भाविकांनी दर्शन घेतले. महिलांसाठी व वृद्धांसाठी वेगळ्या सोयीसुविधांची करण्यात व्यवस्था करण्यात आली होती.  

बार्शी तालुक्यातील झरेगावातील श्री सदुरू दत्त मंदिर हे भक्तांचे श्रद्धास्थान असून दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांचा भक्तीचा महासागर लोटला होता.

महाप्रसाद घेताना भाविक.....

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments