Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संपत पंखे यांची निवड


काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील उपसरपंचपदी भाजपचे संपत पंखे यांची निवड करण्यात आली आहे. 
             
शुक्रवार दि.11 रोजी  दुपारी साडेतीन वाजता येथील  ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेत भाजपकडून संपत पंखे तर काँग्रेसकडून भैरीनाथ काळे यांनी अर्ज दाखल केले होते.यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. यामध्ये भाजपचे संपत पंखे यांना 9  मते पडली.तर प्रतिस्पर्धी भैरीनाथ काळे यांना 7 मते पडली. कॉग्रेसच्या शुभांगी चंद्रकांत काटे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे कॉंग्रेसला धक्का देत भैरीनाथ काळे यांच्या पेक्षा संपत पंखे यांनी दोन मतानी आघाडी घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप नडगिरे, ग्रामपंचायत अधिकारी एल.के.सुरवसे यांनी संपत भिमा पंखे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली. यावेळी निवडणूक निरिक्षक दिलीप नडगिरे, ग्रामपंचायत अधिकारी एल.के. सुरवसे यांनी काम पाहिले. 
          
उपसरपंच पदाच्या निवडीची घोषणा होताच भाजप मधील कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत तुफान  फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन  आनंदोत्सव साजरा केला.त्यानंतर  येथील मुख्य ग्रामपंचायत आवारात नवनिर्वाचित उपसरपंच संपत पंखे यांचा उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,भाजपचे महाराष्ट्र माथाडी कामगार फेडरेशनचे सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे,भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव,माजी सरपंच आदेश कोळी,ग्रा.पं. सदस्य अनिल गुंड, दादा बेग,चंद्रकांत काटे, मकरंद देशमुख, चेअरमन संजय साळुंके व्हाईस चेअरमन धनाजी ढगे,बाळासाहेब भाले,अरविंद ढगे, अनिल बनसोडे,रंजना शिंदे,रेखा गुंड,शुभांगी काटे,आशा भाले,बिस्मिल्ला कुरेशी,पुतळाबाई सोनवणे,अविनाश देशमुख, रणजित देशमुख,अमर देशमुख, हेरार काझी,मंजूर कुरेशी,बाळासाहेब  शिंदे, गोकुळ सोनवणे,प्रभाकर देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले,सुहास साळुंके,भागवत गुंड,ज्ञानेश्वर गुरव,राजु वाडकर,शुभम काटे,त्रिगुणशिल साळुंके,भारत आगलावे,श्रीकांत गाटे, संजय महापुरे,भोलेनाथ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments