Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पत्रकारांचे आर्थिक नियोजन शासनाकडून अपेक्षित - पत्रकार रवींद्र केसकर पत्रकार जगदीश कुलकर्णी,डॉ.सतिश महामुनी, गोविंद खुरुद यांना पुरस्कार प्रदान


तुळजापूर:- प्रदीर्घकाळ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत असे मत पत्रकार रवींद्र केसकर यांनी व्यक्त केले.

पुजारी नगर फाउंडेशन व तुळजापूर पत्रकार संघाच्या वतीने श्रीनाथ लॉन्स येथे पत्रकार जगदीश कुलकर्णी,डॉ.सतिश महामुनी,गोविंद खुरुद यांना तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ पत्रकार ऍड.किशोर कुलकर्णी, अंबादास पोफळे,तसेच महिपतराव कदम यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,महिपतराव कदम उपस्थित नसल्याने श्रीकांत कदम यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास पाठक, सचिव रविंद्र केसकर यांच्यासह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते श्री तुळजाभवानी देवीचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

याप्रसंगी सत्कारमूर्तीच्या वतीने डॉ.सतीश महामुनी यांनी सत्काराला उत्तर दिले. पत्रकार भैरवनाथ कानडे यांचा यावेळी डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्धल संयोजक समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल आगलावे,सूत्रसंचालन डॉ.भैरवनाथ कानडे,आभार सचिन ताकमोघे यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी तुळजापूर पत्रकार संघाचे आणि पुजारी नगर फाऊंडेशनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

तुळजापूरच्या पत्रकारितेला मोठी परंपरा - धनंजय रणदिवे
अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी पत्रकाराच्या एकजुटीसाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या समस्या अनेक आहेत त्या सोडवण्यासाठी देखील चांगला दबाव गट असला पाहिजे असे मत मांडले. 
तुळजापूरचे पत्रकारिता ही कीर्तीमान आहे तुळजाभवानीची देवस्थान असल्यामुळे येथील पत्रकारांना सतत सतर्क राहावे लागते आणि अपार कष्ट करून रिपोर्टिंग करावी लागते याची जाणीव आम्हाला आहे. तुळजापूरच्या पत्रकारितेला मोठी परंपरा देखील आहे असे गौरव उद्गार काढले. 

पुजारी नगर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम - देविदास  पाठक
आज देण्यात आलेले तीन ही पुरस्कार अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना दिले गेले आहेत याचे खूप मोठे समाधान मिळते. पत्रकारिता क्षेत्रात तरुणाईला भविष्य असून तसेच पुजारी नगर फाउंडेशन आयोजित करत असलेले अत्यंत चांगला कार्यक्रम या निमित्ताने केला असल्याचे मत जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास पाठक यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments