Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एनएमएमएस मध्ये सावरगाव प्रशालेची चमक; तीन विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात मानाचा ठसा; एनएमएमएस गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिनी गौरव”

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेने एनएमएमएस परीक्षेत सातत्यपूर्ण यश संपादन करत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

सन २०२५-२६ मधील राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेच्या निवड यादीत समिधा सोमनाथ मेंगले (जिल्ह्यात ११ वी), श्रावणी कमलाकर मोरे (जिल्ह्यात ४ थी) आणि शुभम सुधाकर साळुंके (जिल्ह्यात ८ वा) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेची परंपरा कायम राखली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या हस्ते फेटा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

या शिष्यवृत्तीअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव तसेच केंद्रप्रमुख हनुमंत कदम यांनी कौतुक व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक प्रकाश घोळसगाव, भारती तुपेरे व बापू काळे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पवार, सदस्य सिद्धेश्वर काडगावकर, मुख्याध्यापक रमाकांत गुरव, शिक्षक-शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू काळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन भारती तुपेरे यांनी मानले.

✍️सत्य, वेग आणि विश्वास — Only न्युज धाराशिव”

Post a Comment

0 Comments