काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल गोविंद बनसोडे याने ट्रॅक्टरवर शेतातील मशागतीसाठी येणाऱ्या खर्चाला फाटा देत वेगळीच शक्कल लढवत त्याने त्याच्या शेतात कोळपणी करण्यासाठी स्वतः च्या मोटारसायकला त्यांच्या शेतात कोळपणी (खुरपणी) करण्यासाठी कोळपणी उपकरणाचे जुगाड जोडून त्याद्वारे सोयाबीन पिकातील अंतर्गत मशागत केली.
हे एक अनोखे तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये मोटारसायकलचा वापर करून कोळपणी केली जाते. यामुळे, बैलांची किंवा ट्रॅक्टरची गरज भासत नाही आणि कमी वेळेत आणि कमी खर्चात शेतातील कामे होतात.
त्याने स्वतः च्या मोटारसायकला एक विशेष प्रकारचे कोळपे (खुरपे) जोडलेले असून हे कोळपे फिरवण्यासाठी मोटारसायकल मुलगा चालवत असून पाठीमागील बाजूस कोळपे स्वतः अनिल बनसोडे व त्यांच्या पत्नी द्वारे सोयाबीन पिकातील अंतर्गत मशागत करीत आहेत. त्यामुळे बैलांपेक्षा कमी खर्चिक आणि वेळेची बचत होत असून कमी जागेत आणि सोप्या पद्धतीने काम करता येत आहे. बनसोडे यांनी केलेल्या या जुगाडाची चांगलीच चर्चा होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक उमाजी गायकवाड
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments