Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे आषाढी एकादशी निमित्त किर्तन,हरि जागर,महापुजा,फराळ वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न


काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि.6 रोजी आषाढी एकादशी निमित्त येथील  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात किर्तन सेवा,हरि जागर,महापुजा,फराळ वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रम अतिशय धार्मिक वातावरण पार पडले.

आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी वारकरी संप्रदाय प्रमाणे तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने शनिवार दि. 5 रोजी हरि जागर व मंदीराची फुलांनी व रांगोळीने सजावट करण्यात आली.आषाढी एकादशी दिवशी पहाटे 4 वाजता महापुजा व पहाटे साडेपाच ते रात्री उशिरापर्यंत फराळाचे वाटप करण्यात आले.सकाळी 9 वाजता नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व भाविक बाळ गोपाळासह विठू माऊली व वारकऱ्यांचे पोशाख परिधान करून विठ्ठल नामाच्या जयघोषासह हातात टाळ तसेच पारंपरिक वेशभूषासह महिलांनी डोक्यावर तुळशी घेऊन प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या माणकोजी बोधले महाराज यांच्या दर्शनासाठी काटी पासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बार्शी तालुक्यातील धामणगावकडे प्रस्थान झाले. दुपारी चार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर 6 वाजता हरि पाठ व रात्री नऊ वाजता हभप सुनिल महाराज ढगे यांचा किर्तन सोहळा पार पडला. 
सोमवार दि.7 रोजी माजी पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, राजेंद्र काळे व उत्तम काळे भाविकांना महाप्रसादाच्या वाटपाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला ज्ञात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांनी केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे कौतुक सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक उमाजी गायकवाड 
Only न्युज धाराशिव 
9923005236

Post a Comment

0 Comments