Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“काटीत आंबेडकर जयंतीचा जल्लोष; व्यसनमुक्ती-अंधश्रद्धा निर्मूलनाचा तरुणांना संदेश”

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी (भिमनगर) येथे सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात भीमगीतांच्या तालावर तरुणाईने नृत्याचा आनंद लुटत वातावरण भारावून टाकले.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू झालेली भव्य मिरवणूक रात्री ९.४५ वाजेपर्यंत शांततेत व उत्साहात पार पडली. पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाऊ बनसोडे, बाळासाहेब भाले, माजी सरपंच आदेश कोळी व बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील विविध ठिकाणीही मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. या वेळी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सांगता समारंभात नंदू बनसोडे यांनी व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रभावी मार्गदर्शन केले. “व्यसनामुळे व्यक्तीसह संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा जपायचा असेल, तर व्यसनांपासून दूर राहून शिक्षण आणि विवेकाचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. 

मिरवणुकीदरम्यान “भीमरावांची लेखणी, क्रांतीची नवी दिशा…”, “निळ्या आकाशाखाली, भीमरावांचा झेंडा डौलात…” आदी भीमगीतांनी वातावरण दणाणून गेले. प्रबोधनपर कार्यक्रमानंतर मान्यवरांचा सत्कार व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास दशरथ बनसोडे, दिनेश डोळसे, विलास डोळसे, संभाजी बनसोडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments