Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे संत नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमाने साजरी

 काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दिनांक 23 रोजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. 

 मंगळवारी सायंकाळी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तभारुडचा कार्यक्रम संपन्न झाला. तर बुधवार दि. 23 रोजी श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त येथे पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक व सत्यनारायण महापुजा,दुपारी भजन गायना नंतर दुपारी 12 वाजता  गुलाल व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच सायंकाळी ह.भ.प. सुनिल महाराज ढगे यांचे सुश्राव्य असे हरि किर्तन संपन्न झाले.

यावेळी येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गाटे गल्ली भजनी मंडळ महिला भजनी मंडळ व येथील माळी गल्ली भजनी मंडळातील सदस्यांच्या व भाविकांच्या सहकार्याने संत श्रेष्ठ नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा 
 मुख्य संपादक 
Only न्युज धाराशिव 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments