धाराशिव:- गौण खनिज विषयक
शासनाच्या जाचक अटी व याविषयी सतत बदलत्या धोरणामुळे व्यवसायासाठी अडचणी निर्माण होत आहेत. धाराशिव येथील शासकीय विश्रामग्रहात स्टोन क्रशर व कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मिञा संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार जगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व क्रशर उद्योजकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्व क्रशर उद्योजकानी त्यांचा आई तुळजाभवानीची प्रतिमा व शाल, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटी दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उद्योजकांशी चर्चा करीत असताना त्यांना व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी बाबत चर्चा करुन जिल्ह्यभरातील सर्व क्रशर उद्योजकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाभरातील सर्व स्टोन क्रशर उद्धोजक उपस्थित होते.
ताज्या बातम्यासाठी संपर्क करा...
मुख्य संपादक
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments