काटी/उमाजी गायकवाड
अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त हाेते. म्हणून तुळजापूर तालुक्यातील खु्ंटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी सेवा संघाचे अध्यक्ष अंँड. हणमंत माणिक जाधव यांनी निस्वार्थ भावनेने येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता 9 व 10 मधील पितृछत्र हारवलेल्या व गरजुवंत 12 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुस्तकांचा संच देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी आई, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अ्ँड. हणमंत जाधव म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठु शकतो. आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत यश संपादन करा असे मत व्यक्त केले.
खुंटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. हणमंत जाधव यांचेकडून निस्वार्थ भावनेतून शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून सुरु केलेल्या आजवर अनाथ गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गावातील याञेत सक्रिय सहभाग असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.अडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना शैक्षणिक मदत देण्याचे आदर्श कार्य त्यांनी हाती घेतले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी आई येणुबाई जाधव,जयाजी देशमुख,शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments