Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारी नगर गणेशोत्सव मंडाळाच्या गणरायाची महिलांच्या हस्ते आरती; पुजारी नगर गणेशोत्सवच्या समाजप्रबोधनपर उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुजारी नगर मधील महिला गणरायाची आरती करताना....

तुळजापूर/उमाजी गायकवाड
 तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुजारी नगरमधील सर्व निवाशी महिला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या हस्ते येथील गणरायांची आरती करण्याची परंपरा पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. यंदा या परंपरेला पुढे नेत गुरुवार दि.4  रोजी सायंकाळच्या आरतीचा मान पुजारी नगरमधील निवाशी महिलांना देण्यात आला.

याप्रसंगी पुजारी नगरमधील पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, जेष्ठ नागरिक विश्वनाथ पुजारी यांच्यासह मंडळातील सर्व सदस्य, महिला, आबालवृध्द,तरुण वर्ग तसेच पुजारी नगर  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या आरतीनंतर मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

या उपक्रमामुळे समाजात समानतेचा,ऐक्याचा आणि सन्मानाचा संदेश दृढ होत असून, गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार, पुजारी नगर  फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी आणि गणेशोत्सव मंडळातील सदस्यांनी महिलांचा आदरपूर्वक सन्मान केला. 

                         -गणेश पुजारी, तुळजापूर

गणेशोत्सव सण समाजातील प्रत्येक घटकासाठी समानतेचा, सन्मानाचा व एकतेचा संदेश देणारा सण...
        --गणेश पुजारी
अध्यक्ष पुजारी नगर फाऊंडेशन, तुळजापूर

यावेळी बोलताना पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून, समाजातील प्रत्येक घटकासाठी समानतेचा, सन्मानाचा आणि एकतेचा संदेश देणारे पर्व आहे. पुजारी नगर गणेशोत्सवच्या वतीने यापुढे दरवर्षी स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.

              -श्रावण (मामा) पवार,तुळजापूर

महिलांच्या सन्मानाची परंपरा कायम राखणार...
                श्रावण पवार
अध्यक्ष पुजारी नगर गणेशोत्सव मंडळ तुळजापूर

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने आजपर्यंत पुजारी नगरमधील महिलांचा गौरव करून त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्याची संकल्पना मंडळाच्या वतीने गतवर्षीपासून राबवली असून हि परंपरा मंडळा मार्फत कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.”

             सौ.शुभांगी गणेश पुजारी,
               पुजारी नगर, तुळजापूर

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान महिलांसाठी प्रेरणादायी
                     सौ.शुभांगी गणेश पुजारी

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाच्या आरतीचा मान पुजारी नगरमधील महिलांना देऊन आमचा सन्मान केला. ही आम्हा सर्व महिलांच्या आयुष्यातली अविस्मरणीय भावना आहे. समाजात पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या कामाचे कौतुक व्हावे, हीच अपेक्षा आहे. आज मिळालेला सन्मान आमच्या सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे.”

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो. नं.9923005236

Post a Comment

0 Comments