ढोकी/ सुरेश कदम
29 ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनात राज्यातील करोडो मराठा बाधंव मुबईत तळ ठोकून होते संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या मान्य केल्याशिवाय माघार नाही मला गोळ्या घालून मारा,किंवा झेल मध्ये टाकले तर तेथेही आंदोलन करणार असा सरकारला अल्टीमेटम दिला होता.अखेर आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला आले व 8 मागण्यापैकी 5 मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे ढोकी येथील सकल मराठा बांधवानी बुधवार दि.3 रोजी सकाळी हनुमान मंदीराजवळ सकल मराठा बाधंव एकञ येत ट्रॅक्टर मध्ये छञपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवून बाजुलाच क्रांती अण्णासाहेब पाटील व मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांचे डिजिटल ठेवून छत्रपती शिवाजी महारांजाची आरती पुजन गावातील बांधवाच्या हस्ते करुन आनंदोत्सव मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.
या मिरवणुकीत गुलालाची मुक्त उधळण ,बेन्जोचा खणखणाट व फटाक्याच्या आतिषबाजीत "जरांगे पाटील एक नंबर," "नाद करायचा नाही","एक मराठा लाख मराठा",जय जिजाऊ जय शिवराय"मनोज दादा तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है"
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत मिरवणूक काढण्यात आली. हि मिरवणूक बाजार मैदान,छञपती संभाजी चौक,लातुर बार्शी राज्यमार्गावरुन थेट छञपती शिवाजी महाराज चौकात पोहंचल्यावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments