ढोकी/सुरेश कदम
जेष्ठा गौरी महालक्ष्मी गणपतीचा सण मोठ्या धार्मिक पारंपरिक पध्दतीने घरोघरी विधिवत पुजा अर्चा करुन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करुन मंगळवार दि.2 रोजी गौरी महालक्ष्मीला निरोप देण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील सुपरवायजर व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्राच्या आशासुपरवायजर रेखाताई गुंजकर-कदम व दैनिक पुण्यनगरीचे पञकार सुरेश कदम यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कदम यांच्या घरी महालक्ष्मी देखावा करण्यात आला. यामध्ये मराठा आरक्षणासाठी कदम कुटुंबीयांनी गौरी गणपतीकडे साकडे घातले. महालक्ष्मीच्या हातामध्ये मराठा आरक्षणासाठी घोषणा फलक दिले."आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा", "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे", "एकच मिशन मराठा आरक्षण","मनोज जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांचे फलक लावण्यात आले होते.
तसेच कदम कुटुंबीयांनी क्रांतीज्योती क्रांतीसुर्य सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे देखावे सादर केले. पतंग उडवत असलेली आनंदी रूपातील गौराई,मराठा आरक्षणासाठी भाषण करत असलेली गौराई व मुक्ताई ज्ञानेश्वराच्या रूपातील गौराईचे छोटेसे पिल्लवंड करून जपावे या बंधनास निरामय भावनेने हळुवार जपले मुक्तताई ज्ञानेश्वराने आणि मुख्य गौराईचा हातात हात दिलेल्या मैत्रिणी सारख्या गौराईचा देखावा सादर केला.तसेच सानिका कदम हिने शंकर पार्वतीची मुर्ती सुंदर रांगोळीतुन रेखाटली होती या गौरी महालक्ष्मी पहाण्यासाठी बच्चे कंपनीसह महिलांनी पाहुन कौतुक केले.
विशेष खास बाब म्हणजे गौरी विसर्जनादिवशी संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून अखंड मराठा समाजाला गौरी गणपती पावला अशी भावना मराठा बांधवामधून व्यक्त केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments