तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या पुजारी नगर गणेशोत्सव मंडळांने साधेपणाने देखावे सादर करत पुजारी नगरमधील महिला,लहान मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा,होम मिनिस्टर खेळ पेठणीचा ,रांगोळी स्पर्धा,फँशन वाँक शो, नवरात्र दांडिया महोत्सव, राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार, मराठा वधूवर मेळावा, रंगपंचमी, जागतिक महिला दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, योग दिन, शिवजन्मोत्सव सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, शिवराज्याभिषेक सोहळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,पञकार सन्मान सोहळा, सार्वजनिक गणेशोत्सव,मराठी नववर्ष स्वागत,पुजारी नगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महिलांची मोटारसायकल रँली सारख्या विविध कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन करीत मनोरंजनाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे; तर यंदा गतवर्षीपासून पुजारी नगरमध्ये विविध समाजोपयोगी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती डिझीटल बँनरच्या माध्यमातून स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी या मंडळाच्या अध्यक्षपदी श्रावण पवार तर उपाध्यक्षपदी प्रतिक कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आनंद व भक्तीमय वातावरण
गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण मंगलमय आणि प्रसन्न झाले असून लहान मुलांमध्ये तर मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी 'पुजारी नगर गणेशोत्सव' मंडळाने यंदा प्रथमच बुधवार दि.3 रोजी सायंकाळी येथील श्रीनाथ मंगल कार्यालयासमोर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने 'पुजारी नगर बाल गणेशोत्सव स्पर्धा'. घेण्यात आली. या स्पर्धा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होत्या. या स्पर्धेत संगीत खुर्ची, लिंबू चमचा,पञावळी आठकाठी शर्यत,बकेट मध्ये चेंडू टाकणे, एकमेकांचे फुगे फोडणे या सारखे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती ईश्वरी गणेश पुजारी ठरली तर द्वितीय पारितोषिक विराज सिध्देश्वर इंगोले व तृतीय पारितोषिक कुमारी श्रावणी गायकवाड यांनी पटकावले. तसेच या स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धेतील सर्व चिमुकल्यांना बक्षिसांची लयलूट करता आली.संगीत खुर्ची,लिंबू चमचा या सारख्या स्पर्धा असल्या तरी पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या स्पर्धेची थीम जरा हटके होती. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
आकर्षक गणेश मुर्ती व विद्युत रोषणाई
पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून मध्यभागी आकर्षक झुंबर लावले असून मंडळाने स्थापना केलेली आकर्षक गणरायाची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.या मंडळाच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात येत असून गुरुवारी सायंकाळी अन्नदान तर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात आकर्षक बक्षिसांसह पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पुजारी नगरमधील महिलांसाठी मनोरंजनात्मक "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी व गणेश गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेले सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments