Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथीलयेडेश्वरी कन्या प्रशालेतील सेवानिवृत्त सहशिक्षक दिगंबर कदम यांचा सत्कार सोहळ्याने निरोप

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथी मराठा समाज सेवा मंडळ संचलित येडेश्वरी कन्या प्रशालेतील सहशिक्षक दिगंबर रामचंद्र कदम हे सलग 33 वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले.या निमित्त मंगळवार दि.30 सप्टेंबर रोजी विविध क्षेञातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर संस्थेचे अध्यक्ष सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे, सरपंच सुजित हंगरगेकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे,सपोनि टेकाळे,सरपंच सुजित हंगरगेकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मिराताई ढगे,
मुख्याध्यापक किशोर बनसोडे,माजी सरपंच आदेश कोळी,उपसरपंच संपत पंखे, माजी सरपंच अशोक जाधव,माजी उपसरपंच जुबेर शेख,सुरतगावचे उपसरपंच बाबासाहेब गुंड,अनिल गुंड,विशाल माने, रामेश्वर लाडुळकर,मकरंद देशमुख,नाबाजी ढगे,प्रताप ढगे,संस्थेचे संचालक आदी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सहशिक्षक दिगंबर कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात सहशिक्षक सुनिल खेंदखड यांनी मी आणि माझे सहकारी सहशिक्षक कदम आम्ही दोघेही एकाच दिवशी या संस्थेत रुजू झाल्याचे सांगून त्यांनी  अनेक सेवा कार्यकाळात अनेक संघर्ष केला. दुर्दैवाने गेल्यावर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.तसेच त्यांनी तिन्ही मुलीचे इंजिनीरिंगचे शिक्षण पुर्ण केल्याचे सांगितले.यावेळी मुलींनी आपल्या वडिलांची संघर्ष गाथा सांगताना उपस्थित अनेकांना गहिवरून आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहशिक्षक कदम यांनी सेवाकाळातील भूमिकेवर प्रकाश टाकताना कृतज्ञता भाव व्यक्त करुन गौरव केला. तसेच त्यांनी सेवा कालावधीत केलेल्या केलेल्या कामाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना दिगंबर कदम म्हणाले, मराठा समाज सेवा मंडळ संचलित येडेश्वरी कन्या प्रशालेत ‘‘शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची संधी मला मिळाली,प्रशालेतील माजी विद्यार्थी विविध क्षेञात चांगल्या पदावर कार्यरत आहेत,संस्थेतील सहशिक्षक,ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधानी असल्याचे सांगताना त्यांना अश्रु आवरता आले नाहीत.’’

यावेळी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव,संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे,सपोनि टेकाळे, राठोड, सरपंच सुजित हंगरगेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मिराताई ढगे,माजी सरपंच आदेश कोळी,अनिल गुंड,उपसरपंच संपत पंखे,मुख्याध्यापक किशोर बनसोडे,माजी सरपंच अशोक जाधव,रामहरी थोरबोले,माजी उपसरपंच जुबेर शेख,सुरतगावचे उपसरपंच बाबासाहेब गुंड,विशाल माने,रामेश्वर लाडुळकर,मकरंद देशमुख,नाबाजी ढगे,प्रताप ढगे, संस्थेचे संचालक,भैरीनाथ काळे,अनिल बनसोडे, गोकुळ सोनवणे,श्रीमती सुजाता जुगदार,दत्तात्रय सोनवणे,सहशिक्षक सुनिल खेंदाड, उमाकांत कदम, गणेश गुंगे,तुकाराम गवळी, प्रदीप घाडगे, नंदाश्री चंदनशिवे आदी मान्यवरांसह शिक्षक, पालक, मिञपरिवार विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा..,
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments