काटी:-मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय मुंबई येथे मंगळवार दि. २८ रोजी " राज्यस्तरिय लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार २०२५" हा क्रांती ग्रामविकास संस्था तथा विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन,मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा महत्वपुर्ण व प्रेरणादायी पुरस्कार सोहळा विविध स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्राद्रा येथील श्री .भैरवनाथ माध्यमिक विदयालयाचे सहशिक्षक तथा पञकार भैरवनाथ कानडे यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल,डॉ . निशिगंधा वाड,महाराष्ट्र शासन आयुष्मान भारत समितीचे अध्यक्ष मा.ओमप्रकाश शेटे,कान्स फेस्टिव्हल उत्कृष्ट अभिनेते मा.रोहित कोकाटे यांच्या शुभहस्ते "लोकसंसद राज्यस्तरीय जनप्रेरणा शिखर पुरस्कार २०२५" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेषतः या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सुञसंचलन पुरस्कार प्राप्त पञकार तथा सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले.
भैरवनाथ कानडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments