Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी सावरगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी बाळासाहेब भाले यांची दावेदारी

काटी/उमाजी गायकवाड
 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असून धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार होणार आहे.काटी सावरगाव गटातून काटी ग्रामपंचायत मध्ये दुसरी टर्म निवडूण आलेले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाले यांचे नाव चर्चेत आले आहे.काटी हा मतदारसंघ ओबीसी महिलांसठी राखीव असून भाले हे आपल्या पत्नीला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत.
     
काटी सावरगाव गटातून काटी मधील ग्रा.सदस्य आशा ब्रम्हदेव (बाळासाहेब)भाले यांचे नाव आघाडीवर आहे.बाळासाहेब भाले यांनी 2013 पासून माळी महासंघ,सावता परिषद धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राहून समाजासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे.त्यांनी आजपर्यत ग्रामपंचायत असेल किंवा आमदार निधी जिल्हा परिषद मार्फत 40 लाखांची कामे आपल्या प्रभागामध्ये केली आहेत. त्यामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज, सिमेंट रोड, संत सावता माळी सभामंडप अशी विविध समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत.कोरोना काळामध्ये काटी बस स्टँडवर स्वखर्चातून सॅनिटायझर रूम तयार केली होती.समाजामधे प्रत्येकाच्या सुख दुखःत ते सहभसतात,यामुळे त्यांनी आसपासच्या गावामध्ये सुध्दा समाजामध्ये आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.ते भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांचे अतिशय विश्वासू मानले जातात.भाले यांची भाजपकडे प्रबळ दावेदारी आहे.त्यामुळे आता उमेदवारीची माळ कोणाच्या गळात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments