काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता माथाडी ट्रांसपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे (महाराष्ट्र राज्य) जनरल सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे यांनी काटीतील भाजप शिष्टमंडळासह आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भेट घेऊन जिल्हा परिषद निकडणूकीसाठी एससी पुरुष प्रवर्गामधून काक्रंबा व शहापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची मागणी केली आहे.अनेक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे.गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दिवाळी सणाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत संपर्क साधुन त्यांना आपलेसे केले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी काक्रंबा मतदारांपर्यंत दिवाळी फराळ वाटप उपक्रमातून आघाडी घेतली आहे. सुनिल भाऊ बनसोडे यांनी आपल्या कार्य कौशल्यातुन व आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी जनतेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जनतेचा विश्वास हेच माझे खरे भांडवल असून
पक्षश्रेष्ठी जो मतदार संघ देईल त्या मतदार संघाचा
विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लोकांची कामे करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एससी पुरुष प्रवर्ग काक्रंबा जिल्हा परिषद गटातून सुनिल भाऊ बनसोडे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असुन काक्रंबा जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बुधवार दि. 29 रोजी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे या जागेसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
सामाजिक कार्यात अग्रेसर....
सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ बनसोडे हे मागील अनेक वर्षापासून कोथरूड पुणे व काटी जिल्हा परिषद गटात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
ते राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत,त्यांची एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख आहे.राजकीयदृष्ट्या,ते अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
व्यावसायिक आणि सामाजिक भूमिका: ते भारतीय जनता माथाडी ट्रांसपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि या भूमिकेतून सामाजिक कार्य करीत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक: उमाजी गायकवाड
9923005226
0 Comments