काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील तुळजापूर शुगर प्रा. लिमिटेड गूळ पावडर कारखान्याच्या 2025-2026 पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा धनञयोदशी शुभमुहूर्तावर रविवार दि. 20 रोजी संपन्न झाला.
तुळजापूर कारखान्याचे चेअरमन अँड.अनिल काळे यांच्या हस्ते सपत्नीक हा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला.
कारखान्याच्या पहिला बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यावेळी उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना कारखान्याचे चेअरमन अँड. अनिल काळे म्हणाले की, तुळजापूर शुगर प्रा. लि. कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार असून तुळजापूर शुगरने यावर्षी तालुक्यात उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली असून गतवर्षी 2700 रुपये प्रति टन दर देऊन एकरकमी विनाकपात ऊस बिल वेळेत ऊस पुरवठादार शेकऱ्यांना अदा केले आहे. तसेच वहातूक ठेकेदाराचे शंभर टक्के बील दिले आहे.त्यामुळे तुळजापूर शुगर प्रा. लिमिटेडवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास बसला आहे.
गेल्यावर्षी कारखान्याने 41000 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून या गळित हंगामात 1,5000 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठरवले असून कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेल्या सर्व उसाचे शंभर टक्के गाळप करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देणार असल्याचेही त्यांनी यावेळी ऊस उउत्पादकांना सांगितले.कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन अँड.अनिल काळे,कारखान्याचे संचालक आदित्य काळे, ऋषी वडगावकर,गिरीश देशमुख, चिप इंजिनीर पटेल,श्री.दाऊद यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,वाहन ठेकेदार, कारखाना कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments