Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी,वाडीबामणी,केशेगाव,बेंबळी,काजळा,धाराशिव, आंबेवाडी,उमरेगव्हाण येथे वाडी-बामणीचे मा.उपसरपंच तथा सरपंच परिषद तालुकाध्यक्ष धाराशिव अमर माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड 
धाराशिव तालुक्यातील वाडी-बामणी येथील सामाजिक कार्यात व गावात विविध योजना राबवण्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे (उबाठा)कार्यकर्ते, वाडीबामणीचे मा.उपसरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अमर विलास माने यांचा वाढदिवस मंगळवार दि. 21 रोजी काटी,वाडी-बामणी,केशेगाव,बेंबळी,काजळा, धाराशिव,आंबेवाडी,उमरेगव्हाण येथील मिञपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. 

मंगळवारी दिवसभर व्हाट्सअप ग्रुप,इन्स्टाग्राम, फेसबुक,फोनद्वारे तसेच यावेळी उपस्थित शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते,महाविकास आघाडीतील कार्यकर्ते,पदाधिकारी,हितचिंतक व मित्र परिवाराने अमर माने यांना शुभेच्छा दिल्या. 

मा. उपसरपंच अमर माने यांची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना विनामुल्य जेसीबीद्वारे मदत...
दिनांक 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शेतातील कामगतीसाठी स्वत:ची नवीन जेसीबी विनामूल्य उदात्त भावनेने शेतकऱ्यांच्या संकटकाळात मदत म्हणून दिली. माने यांच्या संकल्पनेतून केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

गावातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा...
गावातील पाणीपुरवठ्याची योजना सातत्याने पाठपुरावा करुन सुरळीतपणे सुरु केली. पाणीपुरवठ्यासाठी 24 तास चालणारा ट्रान्सफर एक्सप्रेस फिडरवरून बसवला. तसेच शेत रस्ते,संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजना, गाव अंतर्गत पेवर ब्लॉक,घरकुल योजना या सारखे विकासकामे प्रभावीपणे राबवली.

खासदार,आमदार,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुखाकडून फोनद्वारे सुभेच्छा!
 शिवसेना (उबाठा) गटाचे लोकप्रिय खासदार ओमराजे (दादा)निंबाळकर, शिवसेनेचे धाराशिव-कळंबचे आमदार कैलास (दादा) पाटील शिवसेना सह संपर्कप्रमुख नंदू (भैय्या) राजे निंबाळकर आदी मान्यवरांनी फोन द्वारे अमर माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या मान्यवरांची उपस्थिती....
यावेळी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे  (उबाठा) युवा नेते ऋषी (भैय्या) मगर,तुळजाई विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव,सहशिक्षक बाळासाहेब नरवडे,नितीन पवार, वनधिकारी शरद शिंदे,काटीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित (भैय्या) हंगरगेकर, अँड.रामचंद्र ढवळे, अर्जुन साळुंके,धनू मगर, सिध्देश्वर वडगावचे लोकनियुक्त सरपंच बळीराम कांबळे,चेअरमन सयाजीराव देशमुख, यशपाल हंगरगेकर,बाळासाहेब हंगरगेकर,अँड.हणमंत जाधव,भैरी काळे,अमोल गावडे,नंदू जाधव,प्रकाश हंगरगेकर,वाडीबामणीचे लोकनियुक्त सरपंच नागेंद्र पाटील,बेंबळी ग्रामपंचायतचे ग्रा.प. सदस्य राजाभाऊ नळेगावकर,उमरेगव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच नागनाथ बोरगावकर,योगेश (भैय्या)शिंदे,सोसायटीचे दिनेश (नाना) गिराम, व्हाईस चेअरमन विश्वजित करळे, उपसरपंच बाळु पवार,बाबासाहेब माने, समाधान माने, यांच्यासह अमर माने मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments