Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार!

कळंब:-कळंब नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार उतरवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे.

कळंब शहर काँग्रेस कमिटीने नगर परिषद निवडणूक २०२५ साठी आयोजित केलेल्या बैठकीत काँग्रेस नेते तथा प्रभारी दादासाहेब मुंडे,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव पांडुरंग कुंभार, स्मिता शहापूरकर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार, वरिष्ठ नेते भागवत धस व ज्योती सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब शेळके होते.

या बैठकीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखण्यात आली. संघटन बळकटीकरण, घराघरात संपर्क मोहीम, नागरिकांपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार आणि स्थानिक समस्यांवर ठोस पर्याय मांडण्यासाठी विविध कृती आराखडे निश्चित करण्यात आले.

बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी “कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा” आणि पक्षाला यशाच्या शिखरावर नेण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. एकजुटीने व जोमाने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कळंब शहर अध्यक्ष शशिकांत निरफळ, हरीभाऊ कुंभार, दिलीप देशमुख, शंकर करंजकर, रवी ओझा, विलास करंजकर, अंजली ढवळे, सचिन गायकवाड, भूषण देशमुख, रोहित कसबे, शीलानंद शिनगारे, ताहेर शेख, बबन हौसलमल , सिद्धू खैरमोडे,  यांच्यासह कळंब शहरातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष नेहमी आघाडीचा धर्म पाळणारा पक्ष..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तळमळीने महाविकास आघाडीचा युती धर्म जपला. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन आघाडीच्या उमेदवारांसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांचे योगदान आणि त्यांच्या राजकीय हक्काचा न्याय देणाऱ्या निवडणुका आहेत.

काँग्रेस पक्ष नेहमीच सामंजस्य, संवाद आणि आघाडीच्या धर्माचे पालन करणारा पक्ष आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानपूर्वक योग्य स्थान व प्रतिनिधित्व देऊन आघाडीत सामील करून घेतले, तर काँग्रेस पक्ष आघाडीबरोबर निवडणूक लढविण्यास तयार आहे.
                                 -- दादासाहेब मुंडे 
                                   काँग्रेस नेते,प्रभारी

स्थानिक स्तरावर कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर निवडूक लढवणार...
स्थानिक स्तरावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान न राखता, त्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न झाला, तर काँग्रेस पक्ष स्वबळावर नगराध्यक्ष पदासह सर्व २० नगरसेवक पदांसाठी रणशिंग फुंकण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
                                  पांडुरंग कुंभार
             सचिव–महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
                    मा.नगराध्यक्ष नगर परिषद कळंब

Post a Comment

0 Comments