Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथील रस्ता कामाचे कार्यारंभ आदेश; जनतेला दिलासा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनआ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव:-शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास ६० कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर कदाचित आत्तापयंर्त ७० टक्के काम पूर्णही झाले असते. आता कायार्रंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव  येथे शनिवारी (दि.२६) या अनुषंगाने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण १८ महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही आ. पाटील यांनी यावेळी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वत: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली. 

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नेहमीच बळ दिले आहे. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काम आता वेगात केले जाणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे श्री.फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १४० कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, श्री.पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कमंत्री जयकुमारजी गोरे यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments