काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातील एक अष्टपैलू नेतृत्व काँग्रेसचे तडपदार व अष्टपैलू जिल्हा उपाध्यक्ष तथा काटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन,कुलस्वामिनी सुतमीलचे संचालक व मावळे तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव विजयसिंह देशमुख यांचा वाढदिवस काटी येथे शुक्रवार दि.17 रोजी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कै.रावसाहेब देशमुख शॉपिंग सेंटर समोर वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
या अभिष्टचिंतन सोहळ्यात येथील काँग्रेस कमिटी,शिवसेना (उबाठा)राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रमंडळी, व ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी साडेआठ वाजता आयोजित कार्यक्रमात मा. सयाजीराव देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व फेटा घालून सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन सेक्रेटरी सुनिल (भाऊ)बनसोडे,माजी सरपंच शामराव आगलावे,भैरी काळे,अनिल बनसोडे,रामेश्वर लाडुळकर,माजी उपसरपंच जुबेर शेख,शिवलिंग घाणे,आबा गाढवे,अमोल गावडे,तानाजी हजारे, सुनिल परिट,सुनिल गायकवाड, दिलीप गाजरे,धनाजी गायकवाड,समीर पठाण,दिपक हांडे आदी मान्यवरांसह मावळे तरुण मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments