Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील बालाजी चवळे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान

काटी/उमाजी गायकवाड 
नवी मुंबई येथील सुप्रसिध्द डॉ.आर. एन.पाटील सुरज हॉस्पिटल यांच्या 21 व्या वर्धापन दिन व स्माइलेक्स डेंटल क्लिनिक व विविध वैद्यकीय उपक्रमांचा उद्धघाटन सोहळा गुरुवार दि. 16 रोजी राज्याचे वनमंञी तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात कोकण विभागाचे विभागीय आयुक्त मा.श्री विजय सुर्यवंशी (IAS) सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ.आर.एन.पाटील, डॉ. अंजली पाटील, डॉ.उदय पाटील,डॉ. रमा पाटील, सुरज पाटील, डॉ.मिनल पाटील, अनिल साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या सोहळ्या दरम्यान सुरज हॉस्पिटल मधील आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन व त्यांच्या कामाचा गौरव व्हावा या उद्देशाने त्यांच्या हॉस्पिटल मधील सेवेबद्दल सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात मागील 17 वर्षापासून सुरज हॉस्पिटलमध्ये रुग्ण वाहिका ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेले तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बालाजी रामचंद्र चवळे यांनी रुग्णवाहिका चालक किंवा इतर रुग्णांसाठी केलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल वनमंञी मा.श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बालाजी चवळे यांना मिळालेल्या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments