तुळजापूर:- संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या तुळजापूर नगर परिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अबाधित राखत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद विलासराव गंगणे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे अमर अशोकराव मगर यांचा 1686 मतांनी पराभव केला आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार विनोद विलासराव गंगणे यांना एकूण 12,272 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे अमर अशोकराव मगर यांना 10,586 मते मिळाली. विनोद गंगणे यांनी या निवडणुकीत 1,686 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी हा निकाल अधिकृतपणे घोषित केला आहे.
या अटीतटीच्या निवडणुकीत 23 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 18 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवले असून महाविकास आघाडीला अवघ्या पाच जागेवर समाधान मानावे लागले. या रंगतदार झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत भाजपने तुळजापूर नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments