Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर पालिकेत भाजपचे वर्चस्व; तुळजापूरच्या विकासाला गती:सर्व समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड, स्थायी समितीवर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची मोहोर

​तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आणि स्थायी समिती गठीत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत आज सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशान्वये आयोजित या सभेमध्ये राजकीय पक्षनिहाय संख्याबळाच्या आधारे सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

नगरपरिषद कार्यालयात रविवारी दि. 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:45 वाजता या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिठासीन अधिकारी म्हणून धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी कामकाज पाहिले.यावेळी तुळजापूरचे मुख्याधिकारी श्री. अजिंक्य रणदिवे व सर्व 24  नगरसेवक उपस्थित होते.महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 65 (4 अ) नुसार या निवडी करण्यात आल्या.

​समितीनिहाय निवडलेले सभापती व सदस्य:
​1. सार्वजनिक बांधकाम समिती:
या समितीच्या सभापती पदी उपाध्यक्ष श्री. रामचंद्र सुखदेव रोचकरी यांची पदसिद्ध निवड झाली. सदस्य म्हणून पंडितराव जगदाळे, लखन पेंदे, औदुंबर कदम, रणजित इंगळे यांचा समावेश आहे.
​2. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती:
सभापती पदी डॉ. अनुजा अजित कदम यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून महानंताबाई साठे, लखन पेंदे, मंजुषा देशमाने आणि अमोल कुतवळ काम पाहतील.
​3. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती:
सभापती पदी श्री. सागर विलास कदम यांची निवड झाली. सदस्य म्हणून मंजुषा देशमाने, प्रियंका गंगणे, लखन पेंदे आणि अक्षय कदम यांची नियुक्ती करण्यात आली.
4. महिला व बालकल्याण समिती:
सभापती पदी सौ. ज्योती अनंत सावंत तर उपसभापती पदी सौ. सरोजा नरेश अमृतराव यांची निवड करण्यात आली. अश्विनी रोचकरी, प्रिया मलकुनाईक आणि प्रगती लोंढे या सदस्य म्हणून राहतील.
5. शिक्षण समिती:
सभापती पदी सौ. नीता दिनेश क्षीरसागर यांची निवड झाली. सदस्य म्हणून प्रियंका गंगणे, जयश्री कंदले, सुनील रोचकरी आणि अमोल कुतवळ यांची वर्णी लागली आहे.

​स्थायी समितीचे गठन
​नियमानुसार सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य झाले असून, नगराध्यक्ष श्री. विनोद (पिटू) विलासराव गंगणे हे या स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतील.त्यामुळे स्थायी समितीवर नगराध्यक्ष विनोद (पिटू)गंगणे यांची मोहोर लागली आहे.
​स्थायी समिती सदस्य:
1. श्री. विनोद (पिटू) गंगणे (सभापती)
2. श्री. रामचंद्र रोचकरी
3. श्री. सागर कदम
4. डॉ. अनुजा कदम
5. सौ. ज्योती सावंत
6. सौ. नीता क्षीरसागर
​संख्याबळ आणि सहकार्य
​नगरपरिषदेतील एकूण 24 सदस्यांपैकी भारतीय जनता पार्टीचे 19 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 5 असे तौलनिक संख्याबळ आहे. यानुसार भाजपा गटाचे 4 आणि काँग्रेस गटाचा १ सदस्य प्रत्येक समितीवर घेण्यात आला. संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्व सदस्यांनी या निवडीवर समाधान व्यक्त केले आहे. सभेचे आभार प्रदर्शन करून पिठासीन अधिकारी यांनी कामकाजाची सांगता केली.


Post a Comment

0 Comments