मुरूम/प्रतिनिधी
शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कै. काकांचे स्वप्न साकार करण्याकरिता बापूराव काकांनी जनतेच्या प्रेमापोटी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. कै. काकांनी अनेक वर्षे नगरपालिकेचे नेतृत्व केले. तीच परंपरा पुढे नेत नगराध्यक्षपदाचा राजकीय वारसा पुढे बापूराव पाटलांच्या रूपाने लाभला. त्यामुळे शहराच्या राजकारणात माधवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचे सामर्थ्य काकांमध्ये आहे.
मुरूमच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या पाटील परिवाराला नागरिकांनी नेहमीच साथ दिली आहे. काकांच्या नेतृत्वाला जनतेची साथ मिळाल्याचे युवा नेते शरण पाटील यांनी प्रतिपादन केले. नूतन प्राथमिक प्रशालेत आयोजित सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मुरूम पालिकेच्या नगराध्यक्षपदी बापूराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल शनिवारी (ता.१७) रोजी त्यांचा फेटा बांधून श्री रामाची प्रतिमा, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन प्रशालेचे मुख्याध्यापक राजशेखर कोरे होते. यावेळी युवानेते शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक राजेंद्र भोसगे, गटनेते गणेश अंबर, नगरसेवक अमर भोसगे, गौस शेख, रुपचंद गायकवाड, सूर्यकांत जाधव, श्रीराम कुलकर्णी आदींसह नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक इरफान मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप राजशेखर कोरे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बळीराम गंगणे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे तर आभार प्रेमनाथ आपचे यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील नूतन प्रशालेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण व नगरसेवक-नगरसेविकांचा सत्कार करताना शरण पाटील, व्यंकटराव जाधव व अन्य.
0 Comments