काटी/उमाजी गायकवाड
महाशिवरात्रीचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील काटी, दहिवडी व सारोळा गावच्या सीमेवर असलेल्या नागनाथ मंदिरात 28 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 ते मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे.
सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकणवाडी यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 विष्णुसहस्त्रनाम, 8 ते 10 अभिषेक, आणि सकाळी ८ ते 12 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. दुपारी गाथा भजन व प्रवचन, तर सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत.
दैनंदिन कीर्तन सेवा पुढीलप्रमाणे:
या सप्ताहात ह.भ.प. विजय महाराज काशिद (दहिठणे), ह.भ.प. प्रभाकर दादा वाघचवरे (ओसा), ह.भ.प. मोहन महाराज जायफळ (काटी), ह.भ.प. सूर्यकांत महाराज शिंदे (सावरगाव), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डाके (पुणे), ह.भ.प. सुनील महाराज ढगे (काटी) आणि ह.भ.प. कुमार महाराज केमधरणी (लोणी) यांची कीर्तन सेवा होणार आहे.
काल्याचे कीर्तन व सांगता:
सप्ताहाची सांगता मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
या सोहळ्यासाठी काटी, दहिवडी, सारोळा परिसरातील ग्रामस्थ मंडळी, पुरुष व महिला भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments