Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Breking news...."मराठी शाळा वाचवायचे असतील तर सत्तेत परिवर्तन घडवा,"आमदार कैलास पाटील ठाकरे सेना



धाराशिव: नमस्कार, Only न्युज धाराशिव मध्ये आपले स्वागत आहे
धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. "मराठी शाळा वाचवायच्या असतील, तर सत्तेत परिवर्तन घडवा," असे ठाम आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी येडशी येथे आयोजित प्रचार सभेत आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली. इंग्रजीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
येडशी येथे झालेल्या या सभेला येडशी आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी येडशी गटाचे उमेदवार देवदत्त भागवत मोरे, पंचायत समितीच्या उमेदवार नीता गजानन नलावडे आणि बालाजी अंबऋषी मनके यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली. "मराठी शाळा टिकवून त्या अधिक आधुनिक करणे हीच आमची भूमिका आहे," असेही पाटील यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments