Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी जिल्हा परिषद गटात भाजपची 'महाविजया'कडे मुसंडी; जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समिती गणांवर भाजपचे वर्चस्व;​भाजप कार्यकर्त्यांचा गुलालाच्या उधळणीत जल्लोष; महायुतीचा झेंडा फडकला​


काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या काटी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ. आशाताई ब्रह्मदेव भाले यांच्यासह काटी व सावरगाव पंचायत समिती गणांतील उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला.

​जिल्हा परिषद: सौ. आशाताई भाले यांचा 2506 मतांनी विजय
​काटी जिल्हा परिषद गटात भाजपच्या सौ. आशाताई ब्रह्मदेव भाले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. त्यांना एकूण 8766 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार सौ.अर्चनाताई भैरीनाथ काळे यांना 6260 मतांवर समाधान मानावे लागले. सौ.भाले यांनी 2506 मतांचे मोठे मताधिक्य घेत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला.
​काटी पंचायत समिती: विक्रमसिंह देशमुख यांची सरशी
​काटी पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार विक्रमसिंह फत्तेसिंह देशमुख यांनी 4448 मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सुजित हंगरगेकर (मिळालेली मते 3009)यांचा 1439 मतांच्या फरकाने पराभव केला. 
अंतर्गत गटबाजीचा फटका
विद्यमान सरपंच असतानाही हंगरगेकर यांना महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठा पक्षाची उमेदवारी घेतल्यामुळे त्यांना अंतर्गत नाराजीचा मोठा फटका बसल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

सावरगाव पंचायत समिती: संतोष बोबडे यांचे वर्चस्व
​सावरगाव पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती संतोष बोबडे यांनी विरोधकांना नामोहरम केले. बोबडे यांना 5034  मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार शंकर शिंदे यांना 2162 मते मिळाली. बोबडे यांनी तब्बल 2753 मतांची मोठी आघाडी घेत आपला वरचष्मा सिद्ध केला.
​काटीत दुहेरी आनंद: सुनील बनसोडे यांचाही विजय
​याच आनंदोत्सवात काटीचे सुपुत्र सुनील बनसोडे यांनी शहापूर जिल्हा परिषद गटातून (SC प्रवर्ग) शिवसेना (शिंदे गट) कडून निवडणूक लढवत 2100 मतांच्या आघाडीने विजय मिळवला. एकाच गावातून दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याने काटी गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
​कार्यकर्त्यांचा जल्लोष
​तिन्ही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच काटी, सावरगाव, खुंटेवाडी, दहिवडसह संपूर्ण गटात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. 'भारतीय जनता पार्टीचा विजय असो' 'राणा दादा तुम आगे बडो'अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या विजयी उत्सवात महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments