मुरूम | Only न्युज धाराशिव प्रतिनिधी
प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनाने आणि महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. उद्घाटन प्राचार्य उल्हास घुरघुरे सर आणि श्री शाळू सर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी उपमुख्याध्यापक कोंढारे सर, पर्यवेक्षक परसाळगे सर, श्री महामुनी सर, श्री राठोड सर, श्री शिवशरण तांबडे सर, श्री चंद्रशेखर कोराळे सर, श्री संतोष बिंदगे सर, श्री चव्हाण सर, श्री स्वामी सर, श्री प्रशांत मुरूमकर सर तसेच कु. अनिशा फुगटे मॅडम, कु. आरती कोराळे मॅडम, सौ. सपाटे मॅडम आणि सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 1928 साली सी. व्ही. रमण यांनी ‘रामन इफेक्ट’ या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती. या क्रांतिकारी शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञानविषयक जनजागृती व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
याच अनुषंगाने विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून विज्ञानाबद्दलची जिज्ञासा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कु. अनिशा फुगटे मॅडम, श्रीमती स्वामी मॅडम व कोराळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु. आस्था अशोक गोडबोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रेया बालाजी भोसले यांनी मानले.
विद्यालयातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन संशोधनाची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
0 Comments