काटी | उमाजी गायकवाड
रमजानचा पवित्र महिना म्हणजे ईबादत आणि संयमाचा काळ. या कडक उन्हात मोठे लोकही उपवास करताना थकून जातात, मात्र तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एका ७ वर्षीय चिमुरड्याने आपल्या भक्तीची चुणूक दाखवली आहे. काटी गावचे माजी उपसरपंच प्रा. जुबेर शेख यांचे चिरंजीव कु. अब्दुलअहद जुबेर शेख याने एवढ्या लहान वयात, उन्हाचा कडाका असतानाही त्याने पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत न चुकता ईबादत करत रमजान महिन्यातील आपला आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत उत्साहाने पूर्ण केला आहे.
अब्दुलअहद याने रमजानच्या नवव्या दिवशीचा हा एक दिवसीय रोजा धरला होता. पहाटेच्या 'सहरी'पासून ते सायंकाळच्या 'इफ्तार'पर्यंत त्याने अत्यंत शिस्तीत आणि आनंदाने आपला उपवास पाळला. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली ही चिकाटी आणि धार्मिक ओढ पाहून परिसरात त्याचे मोठे कौतुक होत आहे.
माजी उपसरपंच प्रा. जुबेर शेख यांच्या सुपुत्राचे यश
प्रा. जुबेर शेख हे काटी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच असून ते सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या मुलाने 7 व्या वर्षीच ही धार्मिक परंपरा जोपासल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. इफ्तारच्या वेळी अब्दुलअहदच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
या यशस्वी पहिल्या रोजाबद्दल अब्दुलअहदवर त्याचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि काटी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'Only न्यूज धाराशिव' च्या माध्यमातून आम्ही अब्दुलअहदच्या या जिद्दीचे कौतुक करतो आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
0 Comments