Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जि. प. प्राथमिक शाळा चव्हाणवाडी मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात — ‘ज्ञानाची पंढरी’ घरोघरी नेण्याचा संकल्प!

काटी/उमाजी गायकवाड 
“मराठी भाषा पोहोचवू घरोघरी, नांदेल सर्वत्र ज्ञानाची पंढरी!” या प्रेरणादायी घोषवाक्यासह जि. प. प्राथमिक शाळा चव्हाणवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा…” अशा काव्यपंक्तींनी मराठी साहित्य समृद्ध करणारे ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने शाळेत मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना काव्यलेखन, कथा, निबंध, पुस्तक परीक्षण, विनोद, लेखन तसेच विविध बोलीभाषांतील शब्दसंग्रह संकलनासाठी प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या लेखनसंपदेचे संकलन करून शाळेचे ‘हस्तलिखित’ तयार करण्याचा संकल्प शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमुखाने केला.

यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका श्रीमती दिपाली व्होटे यांच्या स्वरचित काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताचे अनावरणही करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतींवर प्रभावी भाष्य केले, तर सहशिक्षक श्री. शांताराम कुंभार यांनी मराठी भाषेचा इतिहास, मराठी-इंग्रजी भाषांतील नाते व अभिव्यक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्रीमती सुवर्णा काळे, श्री विकास ढंगे, श्री हनुमंत डोलारे व श्रीमती दिपाली व्होटे यांनी मराठी काव्यगायनाने कार्यक्रम रंगतदार केला.

कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषा संवर्धनाची शपथ घेऊन समारोप करण्यात आला. मराठी भाषेचा अभिमान जागवणारा आणि सृजनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरला.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments