Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पत्रकार धनंजय रणदिवे यांची निवड

​धाराशिव: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी' दैनिक 'पुण्यनगरी'चे वृत्त संपादक धनंजय रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील कृषी अभ्यासकांचे पथक युरोपमधील विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार अभ्यास
​या 12 दिवसांच्या (16 ते 27 फेब्रुवारी) विशेष दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशांमधील अत्याधुनिक शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाने या निवडीबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

​दौऱ्याची प्रमुख वैशिष्ट्ये:
प्रगत शेती तंत्रज्ञान: धान्य पीक शेती, आधुनिक हरितगृह आणि बागायती संशोधन केंद्रांची पाहणी.​
दुग्धव्यवसाय: आधुनिक आणि पारंपारिक दुग्धशाळा, चीज प्रक्रिया केंद्रे, पर्वतीय पशुपालन आणि दूध प्रक्रिया संस्थांना भेटी.​
संशोधन संस्था: जर्मनीतील प्रसिद्ध होहेनहाइम विद्यापीठ संशोधन केंद्राला भेट.
विशेष पाहणी: द्राक्ष बाग, वाईन प्रक्रिया प्रकल्प, जागतिक कीर्तीचा 'आल्समीट फूल बाजार' आणि मत्स्यपालन प्रकल्पांचा अभ्यास.
या दौऱ्याच्या माध्यमातून युरोपातील प्रगत शेती आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती घेऊन त्याचा उपयोग स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी केला जाणार आहे.

​मान्यवरांकडून अभिनंदन
​धनंजय रणदिवे यांच्या या निवडीबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, कृषी सहसंचालक पूनम खटावकर, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, उपाधीक्षक श्री. आसलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments