"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तुळजापूर येथे उद्या रविवार दि.२४ मे रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीत तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळ व शिवसेना शिंदे गटातील सर्व कार्यकर्त्यांनी या भव्य मिरवणूकीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
देवानंद भाऊ रोचकरी यांनी व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, “तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळ शिवसेना शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने तुळजापुरात उपस्थित राहावे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुळजापूरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन महाराजांच्या आदर्शांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.
देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय
देवराज मित्र मंडळ व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष
देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी केले आहे.
0 Comments