Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​श्री तुळजाभवानी देवींची तिसऱ्या माळेला नित्योपचार पूजा संपन्न; नंदी वाहनावरील छबीना मिरवणुकीने तुळजापूर भक्तिमय; ​'आई राजा उदो उदो'चा गजर! श्री तुळजाभवानी देवींचा नंदी वाहनावरून नयनरम्य छबीना


तुळजापूर | ​'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा 
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला, म्हणजेच मंगळवारी, श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा सर्व धार्मिक विधी आणि परंपरांनुसार अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

​महोत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी रात्री) श्री तुळजाभवानी देवींची भव्य 'नंदी' वाहनातून छबीना मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण मंदिर परिसर आणि तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.


​या सोहळ्या प्रसंगी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

​नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापुरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असून, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून दर्शन आणि सुविधांचे चोख नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments