Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

साईराज खोपडे यांची एचडीएफसी बँकेत उपशाखा व्यवस्थापकपदी बढती; पुजारी नगरसह मंगरूळमध्ये कौतुकाचा वर्षाव; एमबीए (फायनान्स अँड बँकिंग) शिक्षणाच्या बळावर यशाला गवसणी; इंदापूर शाखेत स्वीकारली नवी जबाबदारी


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, आजी-आजोबांचे संस्कार आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर पुजारी नगर येथील साईराज सतीश खोपडे यांनी आपल्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. एचडीएफसी बँकेच्या इंदापूर (जि. पुणे) शाखेत त्यांची उपशाखा व्यवस्थापक (डेप्युटी मॅनेजर) या पदावर बढती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे पुजारी नगर, मंगरूळ परिसरासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साईराज खोपडे यांनी फायनान्स अँड बँकिंग या विषयात एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून, बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेला व्यावसायिक अनुभवाची जोड दिली. यापूर्वी ते पुणे येथे एचडीएफसी बँकेत कार्यरत होते. तेथील कामाचा अनुभव, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जबाबदारीने केलेल्या कामाच्या बळावर त्यांना आता इंदापूर शाखेत उपशाखा व्यवस्थापकपदाची नवी जबाबदारी मिळाली आहे.

बँकिंग क्षेत्रात पदोन्नती मिळविणे ही केवळ वैयक्तिक प्रगती नसून, त्यामागे ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांचा महत्त्वाचा वाटा असतो. साईराज खोपडे यांच्या या यशातून शिक्षणाच्या माध्यमातून करिअरमध्ये प्रगती साधता येते, याची प्रचिती येत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांनाही उच्च शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

पुजारी नगरमधील सन्माननीय सदस्य सतीश खोपडे यांचे सुपुत्र असलेल्या साईराज यांच्या यशाने कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि मंगरूळ ग्रामस्थांची मान उंचावली आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

परिश्रम, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल साईराज सतीश खोपडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीतही उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच सदिच्छा.

“मुलाच्या यशाचा अभिमान; कर्तृत्वातून गावाचे नाव उंचवावे हीच अपेक्षा!” — सतीश खोपडे सर
“मुलगा साईराज याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर एचडीएफसी बँकेत उपशाखा व्यवस्थापकपदापर्यंत मजल मारली, याचा वडील म्हणून मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद, छत्रपती शिवरायांची प्रेरणा, आई-वडील व आजी-आजोबांचे संस्कार आणि कुटुंबीयांच्या शुभेच्छा या त्याच्या यशामागील महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. मुलांनी केवळ मोठे पद मिळवावे एवढीच अपेक्षा नसून, त्यांनी आपल्या कर्तृत्वातून कुटुंबाचा, गावाचा आणि समाजाचा नावलौकिक वाढवावा, हीच मनापासून इच्छा असते. साईराजच्या या यशामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला असून, त्याने भविष्यातही प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपत यशाची नवनवी शिखरे गाठावीत, हीच सदिच्छा!”

Post a Comment

0 Comments