Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिवमध्ये १८ ऑक्टोबरला राज्यस्तरीय मराठा वधू-वर सूचक मेळावा; 'सामाजिक गौरव' पुरस्कारांचेही आयोजन


'​Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
धाराशिव | उमाजी गायकवाड 
सकल मराठा वधू-वर सूचक समिती मराठवाडा यांच्या वतीने धाराशिव शहरात राज्यस्तरीय मराठा वधू-वर सूचक परिचय मोफत महामेळावा तसेच 'राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७:०० ते दुपारी ४:०० या वेळेत धाराशिव येथील बार्शी नाका परिसरातील जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
  
​समाजातील विवाहइच्छुक तरुण-तरुणींना आणि त्यांच्या पालकांना योग्य व अनुरूप स्थळ सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने या मोफत मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.  

​उद्घाटन व प्रमुख उपस्थिती
​या राज्यस्तरीय महामेळाव्याचे उद्घाटन तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार असून, काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर हे विशेष उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. भारत महाराज कोकाटे भूषवणार आहेत.  

​तसेच या प्रसंगी भाजप मराठवाडा संयोजक नितीन काळे, माजी जि.प. सदस्य बिभीषण (आण्णा) खामकर, यशवंत ना.सह.पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक, माजी मुख्याध्यापक अशोक ठोंबळ, तानाजी जाधव, संपादक चंद्रसेन देशमुख आणि माजी गटशिक्षणाधिकारी प्रदीप तांबे हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.  

​सामाजिक गौरव पुरस्कार २०२६ चे वितरण
​या महामेळाव्याचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा 'राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार २०२६' देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये किरण निंबाळकर, संगिता काळे, भास्कर जाधव, चंद्रसेन देशमुख, अशोक ठोंबळ, विश्वनाथ वाकुरे, राजु तांबे, प्रदीप तांबे, शिवाजीराव निकम, अशोकराव गायकवाड, हनुमंत भालेकर, किसन वळेकर, गणपतराव गाडगे, अरूण मगर (DySP), रमेश पवार, विक्रम जोगदंड, आण्णासाहेब कदम, सुभाषराव कोलते, सुनिल देशमुख, विजय वाघ, अनिताताई पाटील, ज्योतीराम पवार, उमाकांत तपसाळे, उमाजी गायकवाड, वैजनाथ शिंदे, जयकिसन वाघ, वसंत मस्के, बालाजी भोसले, चंद्रकांत खुणे, ह.भ.प. मधुकर निंबाळकर महाराज, राजेशाहेब निर्मळ आणि ह.भ.प. पांडूरंग गरड महाराज आदी मान्यवरांचा समावेश आहे. 

​सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी
​या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक शेळके, बिभीषण मोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय (बप्पा) पवार, नगरसेवक अभिजित पतंगे, नवनाथ काळे, उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, श्रीराम खामकर, गणेश पुजारी, तानाजी बिरंजे, देवानंद पाटील, संभाजी गायकवाड, शंकर कोळगे, प्रकाश घायतडक, बाळासाहेब शिंदे, राजकुमार ख्रीत, पृथ्वीराज दंडनाईक, महादेव तांबे आणि लखन मुंढे यांसारखे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

​पालकांनी व इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन
​आपल्या पसंतीचे व परिसरातील अनुरूप स्थळ सहज मिळावे यासाठी सकल मराठा वधू-वर सूचक समिती मराठवाडा आणि अशोक गायकवाड, संभाजी गायकवाड, राजु तांबे, अशोक ठोंबळ, ॲड. रमेश भोसले, पांडूरंग गरड महाराज, भास्कर जाधव, प्रदीप तांबे, अमोल निंबाळकर यांसह सर्व आयोजकांनी या मोफत महामेळाव्यास मराठा समाजातील नागरिकांनी व इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.  

​वेळ: रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ७:०० ते दुपारी ४:००)  
​स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव

Post a Comment

0 Comments