Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीच्या कन्येचा MPSC आंदोलनात आक्रमक आवाज; वर्णनात्मक पॅटर्न कायम ठेवण्याची मागणी

काटी/पुणे | उमाजी गायकवाड 
दि. ४ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीवरून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील *अनुजा बळीराम चवळे* हिने आक्रमक भूमिका घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पुण्यात सध्या MPSC च्या आंदोलनाला नवा ट्विस्ट आला आहे. लाल बहादूर शास्त्री रस्ता, एस.एम. जोशी पूल आणि अलका चौक अशा तीन ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. एक गट वस्तुनिष्ठ (Objective / MCQ) पॅटर्नची मागणी करत असताना, दुसरा गट वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न कायम ठेवण्याच्या मागणीसाठी ठाम आहे.

अनुजा चवळे ही वर्णनात्मक पॅटर्नच्या समर्थनार्थ असलेल्या गटात आघाडीवर आहे. माध्यमांशी बोलताना तिने आक्रमकपणे आपली बाजू मांडली.

> "आम्ही तीन वर्ष झाले अभ्यास करतोय. वर्णनात्मक पॅटर्नचा आम्ही पूर्ण अभ्यास केलाय. आता ऐनवेळी पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्न आणणे हे आमच्यावर अन्यायकारक आहे. DESCRIPTIVE PATTERN राहिलाच पाहिजे," अशी ठाम भूमिका अनुजाने मांडली.

आंदोलनातील प्रमुख मुद्दे -
या आंदोलनात सध्या दोन परस्परविरोधी मागण्या समोर आल्या आहेत.

१. वस्तुनिष्ठ पद्धतीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे: वर्णनात्मक पद्धतीमुळे पेपर फुटीचा धोका, मानवी हस्तक्षेपाने होणारे मूल्यमापन आणि निकालातील विलंब होतो. OMR पद्धत अधिक पारदर्शक आहे.

२. वर्णनात्मक पद्धत कायम ठेवण्याची मागणी (अनुजा चवळे हिच्या गटाची भूमिका):
- गेल्या तीन वर्षांपासून हजारो विद्यार्थी UPSC च्या धर्तीवर सुरू केलेल्या वर्णनात्मक पॅटर्नची तयारी करत आहेत.
- देशातील सर्व लोकसेवा आयोगांमध्ये वर्णनात्मक पद्धतच आहे. 
- UPSC मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे म्हणून दलवी समितीच्या शिफारशीनुसार २०२५ पासून हा पॅटर्न लागू करण्यात आला.
- पुन्हा जुन्या पद्धतीकडे जाणे चुकीचे असून आयोगाची स्वायत्तता राखली गेली पाहिजे.
- शासनाने नेमलेल्या व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्यावे.

पुणे येथील टिळक चौकात सुरू असलेल्या या आंदोलनात अनुजा चवळे हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडत, "झुंडशाहीने आणि राजकीय दबावाने पॅटर्न बदलू नये," अशी मागणी केली.

काटी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्पर्धा परीक्षेत आपले स्थान निर्माण करणाऱ्या अनुजा चवळे हिच्या या आक्रमक भूमिकेचे काटी परिसरातून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments